'Jivdani Trust distribute foodgrains to 75lakh+ Vasaikars during lockdown'

02:43 Sep 15, 2021
'जीवदानी मंदिर ट्रस्टचा अद्यापही गरजुंना आधार, ७५ लाखाहून अधिक नागरिकांना अन्न वाटप. आरोग्य सुविधातही पुढाकार  विरार जीवदानी मंदिर देवस्थान ट्रस्टने कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून ते आजही गरजू गरीब नागरिकांसह पालिकेच्या इस्पितळात अन्नवाटप करण्यात येत असून,आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी देखील भर दिला आहे. आतापर्यंत एकूण ७५ लाखाहून अधिक नागरिकांना अन्न वाटप करण्यात आले आहे.या कामगिरीचे पालघर जिल्हा व आजूबाजूच्या परिसरातून कौतुक केले जात आहे.कोरोना संसर्ग सुरु झाल्यावर वसई तालुक्यातील अनेकांचे रोजगार गेले. दोन वेळचे अन्न देखील नशिबी नव्हते.जगायचे तरी कसे. लहान मुलांचा सांभाळ कसा करायचा असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांना भेडसावू लागले याच दरम्यान जीवदानी देवी मंदिर ट्रस्टने अन्नधान्य वाटप तसेच खिचडी वाटप करण्याचा निर्णय घेतला.वसई , नालासोपारा , नायगाव , विरार पासून ते अगदी महामार्गालगत असणाऱ्या ग्रामीण भागात स्वयंसेवकांनी सेवा दिली व रोज जीवदानी मंदिरातून अन्नाचे वाटप करण्यात आले हे विशेष म्हणावे लागेल.या उपक्रमाला साईधाम ट्रस्ट , विरार , विवा चॅरिटेबल ट्रस्ट , यंग स्टार ट्रस्ट , विविध सामाजिक  संस्था , मित्र परिवाराचे सहकार्य लाभले.लॉकडाऊन वेळी बाहेरून आलेल्या पोलिसांना , महापालिका कर्मचारी वर्गाला देखील अन्नाचे वाटप करण्यात आले.एकीकडे कोरोना संसर्ग थांबत नसताना पालिकेच्या इस्पितळात दाखल होणाऱ्या रुग्णांना देखील सेवा देता यावी म्हणून जीवदानी मंदिर ट्रस्टने पाऊल उचलले व सर्व कोव्हीड सेंटरमध्ये असणाऱ्या रुग्णांना जुना महिन्यापासून ते आतापर्यंत रोज सकाळचा नाश्ता पोहे , उपमा , साबुदाणा खिचडी इडली तर दोन वेळच्या जेवणात दोन प्रकारच्या भाज्या , वरण , भात , पोळी देण्यात येत आहे. पौष्टीक आहार म्हणून कडधान्य भाजी देखील असते तसेच बुधवार , शुक्रवार व रविवार या तीन दिवशी अंड , केळी आदींचा समावेश केला जातो.सॅनिटायझर , मास्कसह वाफेची भांडी , ऑक्सिमीटर , स्पायरोमीटर अशा आरोग्य सुविधा देखील ट्रस्टच्या माध्यमातून पुरविण्यात आल्या आहेत.ग्रामीण भागात देखील मागणीनुसार अन्न वाटप केले जात आहे.कोरोना , लॉकडाऊन काळात गरीब , गरजू , आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना जीवदानी मंदिर ट्रस्टने एकप्रकारे मदतीचा हात दिला आहे.आमदार हितेंद्र ठाकूर , माजी महापौर राजीव पाटील ,ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काशिनाथ पाटील , जीवदानी मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष पंकज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली  जीवदानी ट्रस्ट, साईधाम मंदिराचे सर्व विश्वस्त, मंदिराचे कर्मचारी, स्वयंसेवक अद्यापही मेहनत घेत असल्याने हा उपक्रम पराकोटीचा आहे असे नागरिकांतून बोलले जात आहे.   HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.  Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com   https://www.youtube.com/user/hanifmirror   https://twitter.com/hplivenews1   http://google.com/+HPLive9545056667  https://m.facebook.com/groups/1944827725771861  https://m.facebook.com/hplivenews/   https://www.facebook.com/profile.php?id=100000567900512    https://hplive.news/   https://vm.tiktok.com/XffNEd/https://vm.tiktok.com/XffNEd/  https://www.instagram.com/invites/contact/?i=x919x643e3s3&utm_content=ihz4sw1  जीवदानी मंदिर ट्रस्टचा अद्यापही गरजुंना आधार, ७५ लाखाहून अधिक नागरिकांना अन्न वाटप. आरोग्य सुविधातही पुढाकार  Jeevdani Trust distribute foodgrains to 75lakh+ Vasaikars during lockdown  #JivdaniDeviTemple  #DistributeFoodgrains  #VirarJivdaniTemple' 

Tags: Hp live news , Jivdani Devi Temple , BVA , hitendra thakur , Virar jivdani Temple , Sai Dham trust virar , Virar News , Vasaikars during lockdown , Foodgrains Distribute During Lockdown , जीवदानी मंदिर ट्रस्टचा अद्यापही गरजुंना आधार , ७५ लाखाहून अधिक नागरिकांना अन्न वाटप. आरोग्य सुविधातही पुढाकार , Pankaj Thakur , Hitendra Thakur during lockdown , food for needy people , Vasai-Virar News , Covid Centre Vasai Virar

See also:

comments